कोरोनास्थितीत आमचे मार्गदर्शन करण्यास लवकर बरे व्हा; मुख्यमंत्र्यांच्या अमित शहांना शुभेच्छा

Amit Shah & Uddhav Thackeray

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा (Amit Shah) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. खुद्द शहा यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर भाजपच्या (BJP) लहान-मोठे कार्यकर्यांसह अनेक मोठ्या विरोधकांनी अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहांना कोरोनावर मात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच लवकर बरे होऊन मार्गदर्शन करण्याची भावना व्यक्त केली आहे.

‘अमित भाई, आपण लवकरात लवकर बरे व्हा आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण ताकदीसह पुन्हा कार्य करा आणि या कोरोना परिस्थितीत आमचे मार्गदर्शन करीत राहावे अशी प्रार्थना करतो’, असे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER