पावसाळ्यात ‘अश्या’ पद्धतीने मिळवा चप्पलांच्या वेदनांपासून आराम..

bite

पावसाळ्यामध्ये अनेकदा आपल्याला चप्पलचा त्रास होतो. त्यात जर नवीन चप्पल असेल तर मघ त्वचेसोबत सतत घर्षण झाल्याने त्रास होतो. तुम्ही ही जर नवीन चप्पल किंवा बूट घेतले असणार आणि तुम्हाला ही शु बाईटचा त्रास होत असेल तर हा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की लक्षात ठेवा.

ही बातमी पण वाचा : पावसाळ्यात अशी घ्या ‘पायांची’ काळजी….

  • खोबरेल तेल :- चप्पल चावल्यावर खोबरेल तेल लावतात हे बऱ्याच जणांना ठाऊक असेल. जखमेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा मॉयश्चराइज होऊन जखम बरी होण्यास मदत होते व जंतूसंसर्ग होण्यापासूनही बचाव होतो. तसेच नवीन चप्पल वापरण्याअगोदर तिला खोबरेल तेल लावल्यास ती मऊ होते व त्रास होत नाही.

coconut oil

  • टूथपेस्ट :- चप्पल चावल्यामुळे येणारा फोड आणि खाज यांपासून टूथपेस्टने कसा आराम मिळेल, याचे आश्चर्य वाटले ना? टूथपेस्टमध्ये जखम बरी होण्यासाठी आवश्यक बेकींग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि मेन्थॉल असते. रात्री झोपताना जखमेवर थोडीशी टूथपेस्ट लावावी व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर त्यावर पेट्रोलियम जेली लावावी. यासाठी जेल-बेस्ड टूथपेस्ट लावू नये.

 toothpaste

  • कोरफड :- कोरफडीमुळे जळजळणे, खाज सुटणे आणि वेदनांपासून आराम मिळतो. कोरफडाच्या गरातील दाहशामक क्षमतेमुळे जखम लवकर बरी होऊन जंतूसंसर्ग होण्यापासून बचाव होतो. कोरफडाचा गर काढून जखमेवर लावावा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. असे 3-4 दिवस सकाळ–संध्याकाळ करावे.

aloevera

  • हळद आणि कडुलिंबाची पाने :- हळद ही जंतूनाशक आणि कडुलिंबाची पाने दाहशामक असल्याने यामुळे   चप्पल चावल्यामुळे जखम होणे, खाज सुटणे किंवा सुजणे यांपासून आराम मिळतो. कडूलिंबाची पाने बारीक वाटून त्यात हळद मिसळून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावून 20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावी. जखम लवकर बरी होण्यासाठी ही पेस्ट दिवसातून दोनदा लावावी.

neem

  • तांदळाचे पीठ :- चप्पल चावल्यास तांदळाच्या पिठानेही झटकन उपाय करता येतो. यामुळे शुष्क त्वचा निघून जाते, तसेच दाह आणि खाजही कमी होण्यास मदत होते. तांदळाच्या पिठामध्ये पाणी मिसळून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावावी व सुकल्यावर पाण्याने धुवावी. जखम बरी होईपर्यंत हा उपाय करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER