तयारीला लागा पुणे विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

Pune University

पुणे :- पुणे विद्यापीठाच्या (Pune University) परीक्षांच्या अखेर तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा (Exam online) होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, आता या परीक्षा घरातून ऑनलाईन पद्धतीने होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबतचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात घेतला जाणार आहे.

दरम्यान, पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा येत्या १५ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ ते २० मार्च या कालावधीत घेण्यात येईल तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३० मार्चपासून सुरु होणार आहे. तर अंतिम वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली आहे.

परीक्षा ऑनलाइन पद्धतीमुळे होणार असल्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोपे जाईल. तसेच वेळेची बचतही होणार आहे. विशेष म्हणजे परीक्षांचा निकालही लवकर लागणार आहे.

परीक्षेचे केले जाणार नियोजन गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखण्यासाठी परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. यावर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER