आठ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा – डॉ. नितीन राऊत

Nitin Raut

नागपूर : आठ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका महत्त्वपूर्ण असल्याने काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जाती विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. मोदी सरकारच्या (Modi Government) अपयशाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केले.

अनुसूचित जाती विभागाच्या सर्व राज्यांचे प्रमुख व राष्ट्रीय प्रभारींच्या कामाचा आढावा डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आॅनलाईन बैठकीद्वारे घेतला. यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या (Corona) संकटातून आपण सर्व जण जात असताना येत्या काही महिन्यांत आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुकासुद्धा होणार आहेत. या निवडणुका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यात उत्तरप्रदेश, गुजरात, हिमाचलप्रदेश व पंजाब या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेसला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी अनुसूचित जाती विभागाला अधिक कार्यक्षम होण्याची आवश्यकता आहे. विविध राज्यांच्या काँग्रेस प्रदेश समितीकडून आता अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व व प्रदेश समितीच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेत असल्याचे अनेक प्रतिनिधींनी सांगितले. हे चांगले संकेत असून पुढील काळात यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विधानसभेच्या काँग्रेस गटनेतेपदी तामिळनाडू अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सेल्वापुरूथगाई यांची नियुक्ती केली आहे. ही अनुसूचित जाती विभागाच्या कामाला मिळालेली पावती असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

या आॅनलाईन बैठकीचे संचालन अनुसूचित जाती विभागाचे महासचिव चंद्रसेन राव यांनी केले. या आॅनलाईन बैठकीत उपाध्यक्ष ब्रिजलाल खाबरी, राजस्थान व छत्तीसगड राज्याचे प्रभारी राजाभाऊ करवाडे, गुजरात राज्याचे प्रभारी अनिल नगरारे यांच्यासह मनोज बागडी, राजकुमार कटारिया, तरुण वाघेला, सतीश बंधू, राजेशकुमार, सुरेशकुमार, रितू चौधरी, गोपाल डेनवाल, धनेश पटीला, क्षितिज अड्याळकर, धर्मवीर, आलोक प्रसाद आदींनी सहभाग घेतला. या बैठकीत राज्यांच्या प्रमुखांनी कोरोनाकाळात सुरू असलेल्या सामाजिक कामाची माहिती दिली तसेच प्रभारींनी संबंधित राज्यांच्या कामाचा आढावा सादर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button