आता तरी घरातून बाहेर निघा ! नितेश व निलेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

'मातोश्री' उडवून देण्याच्या धमकीवर झोम्बणारे ट्विट

Nitesh Rane & Uddhav Thackeray & Nilesh Rane

मुंबई : मुख्यमंत्री व शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान उडवून देण्याच्या धमकीचा फोन दुबईवरून आला. याचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या बाहेर निघत नाहीत याच्याशी संबंध जोडून भाजपाचे नेते नितेश (Nitesh Rane) व निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरेंना झणझणीत टोमणा मारला – आता तरी घरातून बाहेर निघा !

या धमकीच्या कॉलवर राणे बंधुनी उपरोधिक ट्विट केले – “शेवटी महाराष्ट्राच्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबईवरून फोन आला. डायरेक्ट दाऊदची धमकी आली. आता तरी घरातून बाहेर निघा मुख्यमंत्री साहेब!!,”

“दाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन! मंत्र्यांचे फोन उचलत नाही अन् दाऊदचा लगेच उचलला?,” असा खोचक प्रश्नही निलेश राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ बंगल्यावर चार कॉल आले. बंगला उडवून देण्याची धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्याचे सांगण्यात आले. हे कॉल दुबईतून येथून आले असून, फोन करणाऱ्या व्यक्तीने तो दाऊदचा हस्तक असल्याचा दावा केला आहे. या वृत्तानंतर ‘मातोश्री’वर पहारा वाढवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER