मंत्रिपद फक्त नाचण्यासाठी नसते; हर्षवर्धन पाटलांचा भरणेंना टोला

harshvardhan patil - Dattatray Bharne

इंदापूर : मंत्रिपद हे केवळ नाचण्यासाठी नव्हे, तर लोकांची कामे करण्यासाठी असते, असा सणसणीत टोला भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) यांच्यावर लगावला. आम्ही बघतोय किती कामं होत आहेत. १४ कोटी जनतेपैकी ४० ते ४२ लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळत असते. त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये तसे  लोक दिसत नाहीत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली. ते रविवारी इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणीही भाष्य केले. सरकार चालवताना नैतिकता बाळगावी लागते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तथ्य ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून बाहेर आले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. सार्वजनिक जीवनात काम करताना नैतिक मूल्य सांभाळून काम करावं लागतं. ते सध्या होताना दिसत नाही. अशी किती प्रकरणे झाल्यावर सरकारला जाग येईल, असा सवाल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER