मोफत लसीकरणासाठी BMCची आर्थिक मदत घ्यावी; राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

Rahul Shewale - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्य सरकार सध्या राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याच्या विचारात आहे. यासाठी सुमारे ५.५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मोफत लसीकरणासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेची मदत घ्यावी, अशी सूचना शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केली आहे.

या संदर्भात राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी मोफत लसीकरणासाठी आर्थिक निधीची तरतूद कशी करता येईल याबाबत उपायसुद्धा सुचवला आहे. मुंबई महापालिकेची एफडी तोडून लसीकरणासाठी निधी उभारला जावा, अशी सूचना शेवाळे यांनी केली. “मुंबई महापालिकेकडे ७० हजार कोटींच्या मुदत ठेवी जमा आहेत. मुंबईने संकटाच्या वेळी महाराष्ट्र व देशाला वेळोवेळी मदत केली आहे. जर राज्य सरकारला निधीची कमतरता भासली असेल तर मुदत ठेव भंग करून महापालिकेने राज्य सरकारला सहकार्य करावे आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा पैसे महामंडळाकडे जमा करावे.” असे शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे.

येत्या १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे. हा लसीकरणाचा तिसरा टप्पा आहे. १८ व ४५ या वयोगटातील संख्या मोठी असल्याने हे लसीकरण सुरळीत पार पडावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर लसीच्या किमतींचा मुद्दाही चर्चेत आहे. राज्यातील नागरिकांना लस मोफत द्यावी, असा एक मतप्रवाह महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button