कोकणातील धूपप्रतिबंधक बंधार्‍यांसाठी सीआरझेडच्या परवानग्या वेगाने मिळवा : आदित्य ठाकरेंचे आदेश

Aditya Thackeray

मुंबई : राज्याच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी तसेच खाडी किनारी भागाला मोठा फटका बसला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे समुद्राचे पाणी घुसून घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सागरी आणि खाडी किनार्‍यालगतच्या गाव संरक्षणासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी सीआरझेडच्या परवानग्या तातडीने मिळावा, (CRZ permits for Konkan sun protection dams)असे आदेश राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी दिले . शिवसेना खासदार विनायक राऊत(Vinayak Raut) यांच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते .

रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सागरी आणि खाडी किनार्‍यालगतच्या गावांचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याची योजना आहे. मात्र, हे बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असलेली सीआरझेड परवानगी मिळण्याबाबतच्या प्रस्तावांना मान्यता देण्याची प्रक्रिया वेगाने करावी, असेही ठाकरे म्हणाले .

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 21 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 28 प्रस्ताव पत्तन व्यवस्थापनाने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले आहेत,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रस्तावावरही संबंधीत जिल्हाधिकार्‍यांनी नियमानुसार योग्य तो निर्णय घेऊन प्रस्ताव लवकरात लवकर सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावेत, असे आदेश त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button