शेतकरी आंदोलनावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा… मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून इशारा

abasaheb patil

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चानेही भारत बंदला पाठींबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘भारत बंद’मध्ये मराठा क्रांती मोर्चा भारत बंदमध्ये सहभागी झाला आहे. शेतकरी आंदोलनावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा वेळ पडल्यास हाच कोयता हातात घेऊ’ असा गंभीर इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Thok Morcha) आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी दिला आहे.

शेतक-यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने ठाम पाठींबा दर्शवला आहे. भारत बंद च्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असे चित्र आहे. त्यातच मराठा क्रांती ठोक मोर्चानेही शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा देत देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन बंदला समर्थन दिले आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांचा आजचा हिंदुस्थान ‘बंद’चा ‘एल्गार’ सरकारला जाणीव करून देण्यासाठीच – सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER