जर्मन ब्रॅंडच्या शूजचा चीनमधून काढता पाय, आग्रा येथे आगमन

परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला यश आले आहे

लखनऊ: परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास उत्तर प्रदेश सरकारला यश आल्याचे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून बाहेर पडणा-या आमि चीनला पर्याय शोधणा-या जर्मन शू ब्रंडने चीनमधून आपला काढता पाय घेचतला व भारताच्या राजधानी दिल्लीतील आग्रा येथे आपला व्यवसाय सेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

कासा एव्हर्झ जीएमबीएचच्या मालकीचे वॉन वेलॅक्सने चीनमधून आपला व्यवसाय हटवला आहे. त्यांची चीनमधे बूट उत्पादनाच्या संपूर्ण व्यवसायात वर्षाकाठी तीन दशलक्ष जोड्यांची क्षमता असून आता उत्तर प्रदेशात 110 कोटी रुपयांच्या बुटांच्या उत्पादनासह आग्रा येथे व्यवसाय प्रारंभ केला आहे. वॉन वेलॅक्स आणि आयट्रिक इंडस्ट्रीज प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रामध्ये तेवढ्याच क्षमतेच्या उत्पादनाचे नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार करण्यात येणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

वॉन वेलॅक्स हा ब्रँड 2019 मध्ये भारतात उपलब्ध झाला. आयट्रिक इंडस्ट्रीजचे उत्पादन 5 लाखांच्या मालासह आग्रामध्ये तयार करण्यात आले आहे. सरकारी सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे दोन वर्षांत ही कंपनी पूर्ण उत्पादनाची क्षमता गाठेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. सध्या पहिल्या टप्प्यात ११० कोटींची गुंतवणूक करण्याची कंपनीची तयारी आहे.

अधिका-याने सांगितले की, दुसर्‍या टप्प्यात या कंपनीने आत्ताच आउटसॉल्स, स्प्र सिअल फॅब्रिक्स आणि रसायने जे भारतात तयार केली जात नाहीत अशा कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी सिलरी उद्योग स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता.

परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला यश आले आहे. यामुळे उत्तर प्रदेश सरकार राज्यातील कामगारांना स्थानिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना स्थानिक रोजगार मिळेल असा प्रयत्न करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला