जर्मन पदाधिकाऱ्याने केले फेडररवर गंभीर आरोप

Roger Federer

राॕजर फेडरर (Roger Federer) हा व्यावसायीक टेनिसमधील (Professional Tennis) सर्वात सफल आणि जेंटलमन खेळाडू मानला जातो. तो क्वचितच विवादांमध्ये अडकलेला दिसतो आणि त्याच्याबद्दल सहसा सहकारी टेनिसपटूंसह सर्वच चांगले बोलताना दिसतात. पण एका व्यक्तीने राॕजर फेडररवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. त्याच्या आरोपानुसार आपले स्थान सुरक्षित राखण्यासाठी फेडररने जागतिक क्रमवारीच्या पध्दतीतच बदल केले आहेत. यासाठी एटीपी प्लेयर्स कौन्सीलमधील (ATP players Council) आपल्या पदाचे वजन फेडररने वापरल्याचा आरोप जर्मन टेनीस फेडरेशनचे उपाध्यक्ष डिक हार्दोर्फ (Dick Haardoff) यांनी केला आहे.

यंदा कोरोनामुळे टेनिसच्या स्पर्धा कमीच झाल्या पण त्यातही फेडरर दुखापतीमुळे आणखीनच कमी स्पर्धात सहभागी झाला. तरीसुध्दा तो जागतिक क्रमवारीत टॉप फाईव्हमध्ये कायम आहे. कोरोना संकटामुळे क्रमवारी पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत. पुरुषांच्या टेनिससाठी एटीपीने आणि महिलांच्या टेनिससाठी डब्ल्यूटीएने हे बदल केले आहेत पण ते कुणाच्या प्रभावाखाली वा दबावाखाली केल्याचे दिसून आलेले नाही, मात्र डीक हार्दोफ यांनी फेडररवर हे बदल करण्यासाठी आपला प्रभाव वापरल्याचा आरोप केला आहे.

आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी फेडररने क्रमवारीची पध्दतच बदलून टाकली. हे चुकीचे असून बेजबाबदारपणाचेही असल्याचा आरोप हार्दोफ यांनी केला आहे. प्लेयर्स कौन्सीलमधील आपल्या पदाचा तो गैरफायदा घेत आहे, हे बदल केले नसते तर तो पहिल्या 50 मध्येही राहिला नसता असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER