मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गिकांसाठी जर्मन बँकेचे ४,७६७ कोटींचे कर्ज

वर्षभराच्या वाटाघाटींनंतर झाला करार

MMDRA & KFW

मुंबई : जर्मन सरकारच्या मालकीच्या ‘केएफडब्ल्यू’ (KFW) या विकास बँकेने मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गिकांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास(MMRDA) ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेची (सुमारे ४,७६७ कोटी रुपये) दोन कर्जे मंजूर केली आहेत.

सुमारे वर्षभराच्या वाटाघाटींनंतर  बँकेने शुक्रवारी हे कर्ज प्रस्ताव मंजूर केले. आता यासाठी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाशी औपचारिक करार केला जाईल. भारतातील कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामासाठी या बँकेने मंजूर केलेले हे सर्वात मोठे कर्ज आहे. यापैकी ३४५दशलक्ष युरोचे कर्ज  विकासात्मक (Devlopmental Loan) व  २०० युरोचे कर्ज प्रवर्तनात्मक (Promotional Loan)असेल.

मुंबईतील वडाळा आणि ठाण्यातील कासारवडवली यांना जोडणारी मेट्रो मार्गिका ४ व  कासारवडवली आणि गायमुख या ठाण्यातीलच दोन भागांना जोडणारी मेट्रो मार्गिका ४ए च्या कामासाठी हे कर्ज आहे. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो रेल्वेच्या एकूण ३३७ किमी लांबाच्या सहा मार्गिका टाकण्याची ‘एमएमआरडीए’ची महत्वाकांक्षी योजना आहे.

या कर्जमंजुरीबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ही खूप चांगली बातमी आहे. आता सर्व अडथळे दूर होऊन मेट्रोच्या ४ व ४ए या दोन्ही मार्गिका लवकर मार्गी लागू शकतील.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER