धान्य वितरणातील गैरव्यवहार टाळण्यासाठी जिओ टॅगिंगद्वारे ठेवणार वॉच

रत्नागिरी/प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटपाच्या योजनेत पारदर्शकता राहावी आणि गैरव्यवहार होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जिओ टॅगिंगद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे.

कोरोनामधील लॉकडाऊन वाढविल्याने केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मोफत धान्य वितरणाचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. या योजनेत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत पारदर्शकता राहावी आणि गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात जिओ टॅगिंगद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. त्याच्या तडक तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. अनेक भागात या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या योजनेत आणि धान्य वितरणात गैरव्यवहार होऊ नये, यासाठी दुकानावर वितरित करण्यात येणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीपासून ते धान्य ग्राहकांना वितरण करण्याच्या प्रक्रियेच्या सर्व हालचाली जिल्हा पुरवठा विभागाकडून नोंदविण्यात येणार आहेत. तसेच या यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. दुकानावर या योजनेत गैरव्यवहार झाल्यास त्वरित कारवाई करण्याची तयारी पुरवठा विभागाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER