वाढत्या महागाईने सामान्य हैराण

Nehangayi

सातारा : वाढत्या महागाईने सामान्य हैराण झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने तर सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. डिझेल व पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. जोडीला खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. कडधान्यांचे दरही तेजीत आहेत. या महागाईतून सर्वसामान्यांना जीणे महाग होऊ लागले आहे. याच दरम्यान, शासनस्तरावर महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र महागाई कमी होताना दिसत नाही. बाजारपेठेत वितरण व्यवस्थेतील त्रुटी, दलालांची नफेखोरी आणि साठेबाज हे वाढत्या महागाईला कारणीभूत ठरत आहे.

दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंच्या दरावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. महागाईने समाजातील सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने प्रवास व वाहतुकीच्या खर्चात वाढ होत आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तुबरोबरच सर्वच साहित्यांवर होत आहे. भाजीपाल्यांची दरवाढही सामान्य ग्राहकांना असह्य ठरत आहे. भाजी खरेदी करतानाही सर्वसामान्यांना तोलून मापून खरेदी करावी लागत आहे. साध्या-साध्या भाज्यासह भाजीपाला खरेदी केला तरी खिशाला सुमारे तीनशे ते चारशे रूपयांची सहज खरेदी होते. शासनानेच आता कडक उपाययोजना राबवित सामान्यांना दिलासा देण्याची मागणी होऊ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER