रिलायन्स जिओमध्ये ‘जनरल अटलांटिक’ची साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक

General Atlantic - JIO

मुंबई :- रिलायन्स जिओमध्ये न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी ‘जनरल अटलांटिक’ने ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा रविवारी केली. जनरल अटलांटिक जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. जनरल अटलांटिकची आशियाई कंपनीतील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

गेल्या चार आठवड्यात रिलायन्स जिओमध्ये चार मोठ्या गुंतवणुकदारांनी ६७,१९४.७५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. सर्वप्रथम फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करून ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला.

फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी ‘सिल्व्हरलेक’ने ५,६६५.७५ कोटी रूपये गुंतववून जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला. त्यांनी कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

ही बातमी पण वाचा : राज्यांची कर्जमर्यादा वाढवली 4.28 लाख कोटींपर्यंत घेऊ शकतील कर्ज

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य ४.९१ लाख कोटी रूपये आणि एन्टरप्राईझेस व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपये झाली आहे, अशी माहिती रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांनी दिली. आतापर्यंत या चार गुंतवणुकीतून कंपनीचा १४.८ टक्के हिस्सा विकण्यात आला आहे.

ग्लोबल इंडिस्ट्रिजचे व्हॅल्यू पार्टनर म्हणून मी स्वागत करतो. जनरल अटलांटिकला भारतावर विश्वास आहे. तसेच आमच्या डिजिटल व्हिजनवर देखील त्यांचा विश्वास आहे. यासाठी त्यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुतवणूक केली आहे, असे अंबानी म्हणालेत. ही गुंतवणूक म्हणजे रिलायन्सचा कर्जमुक्तीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आहे, असे उद्योगातील जाणकारांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : General atlantic invests rs 6500 crore in reliance jio

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)