चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून जिलेटीन आणि डिटोनेटर जप्त

gelatin and detonator

कोझिकोड : केरळमध्ये कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून एका महिलेजवळून १०० पेक्षा जास्त जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर जप्त करण्यात आल्या. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके बाळगणाऱ्या रमानी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ती मूळ तामिळनाडूची आहे. विहिर खोदण्यासाठी ही स्फोटक नेत होती, असे तिने पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER