अपक्ष आमदार गीता जैन शिवबंधनात; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

geeta-jain-to-join-shivsena.jpg

मुंबई :- मिरा भाइंदरच्या (Mira Bhayander) अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. आमदार गीता जैन यांनी एकट्यानेच शिवसेनेत प्रवेश केला, मात्र भाजपचे नगरसेवक मॉरिस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे आणि विजय राव यांच्यास जवळपास १० नगरसेवक गीता जैन यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जैन या महापौर असताना कामकाज व वादग्रस्त मुद्द्यांवरून माजी आमदार नरेंद्र मेहतांशी त्यांचे बिनसले. त्यानंतर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे मानले जाणारे मेहता यांच्याच पारड्यात गेल्या वर्षी उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. राज्यात भाजपने सरकार बनवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आणि जैन यांना पुन्हा पक्षासोबत येण्याचा आग्रह धरला होता. मात्र आता गीता जैन यांनी शिवसेनेला जवळ केले आहे. त्यांच्या येण्याने शिवसेनेला आणखी बळकटी मिळेल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्याने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER