ख्रिस गेल व वसिम मुहम्मदने केवळ षटकार-चौकारांनीच झळकावले अर्धशतकं

Wasim Muhammad - Chris Gayle

युनिव्हर्स बॉस (Universe Boss) म्हणजे ख्रिस गेल (Chris Gayle) याने क्रिकेटचे सामने जसजसे छोटे होताहेत तसतसा आपला धावांचा वेग वाढवला आहे. वन डे आणि टी-20 क्रिकेटमधील तुफानी फलंदाजीचे अनेक विक्रम आपल्या नावे लावल्यानंतर त्याने टी- 10 क्रिकेटमध्येही (T10 cricket) आश्चर्यचकित करुन सोडणाऱ्या वेगाने धावा जमवण्याचा धडाका लावला आहे.

अबू धाबी टी- 10 स्पर्धेत त्याने बुधवारी टीम अबुधाबीसाठी (Team Abu Dhabi) फक्त 22 चेंडूतच सहा चौकार व 9 षटकारांसह नाबाद 84 धावा फटकावून काढल्या. परिणामी त्यांनी मराठा अरेबियन्सविरुध्दचा (Maratha Arabians) 10 षटकांचा सामना 5.3 षटकांतच म्हणजे 60 चेंडूचा सामना 27 चेंडू शिल्लक राखून जिंकला आणि टीम अबुधाबीच्या 100 धावात एकट्या ख्रिस गेलच्या 84 धावा राहिल्या. 22 चेंडूत 84 धावा म्हणजे तब्बल 381.82 च्या अविश्वसनीय स्ट्राईक रेटने या धावा जमवल्या.

या दरम्यान युनिव्हर्स बॉसने अर्धशतक फक्त 12 चेंडूतच पूर्ण केले. त्यात पाच चौकार व पाच षटकार होते म्हणजे त्याने षटकार व चौकाराशिवाय एकही धाव धावून घेतलेली नव्हती. या खेळीत

0, 0, 4, 4, 4, 6, 6, 6, 6, 4, 6, 4,6, 1, 6, 6, 1, 4, 2, 1,1, 6

असे त्याचे फटके राहिले.

12 चेंडूत अर्धशतक झळकावले असले तरी युनिव्हर्स बॉस सर्वात जलद राहिलेला नाही. टी-10 क्रिकेटमध्ये आणखी दोन खेळाडूंच्या नावावर फक्त 12 चेंडूत अर्धशतक आहे. मोहम्मद शहझाद (2018) व वसिम मुहम्मद (2021) हे ते दोन खेळाडू आहेत.

नॉदर्न वाॕरियर्सचा (Northern Warriors) सलामीवीर वसिम मुहम्मदनेही (Wasim Muhammad) बुधवारीच गेलप्रमाणे फक्त 12 चेंडूत अर्धशतक साजरेकेले. त्याने पुणे डेव्हील्सविरुध्द 13 चेंडूतच 3 चौकार व सात षटकारांसह नाबाद 56 धावा केल्या म्हणजे वसिमचा स्ट्राईक रेट ख्रिस गेलपेक्षाही जास्त 430.77 चा राहिला आणि त्यानेसुध्दा सर्व धावा चौकार षटकारांनीच जमवल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER