अरे बापरे! सुनील गावसकर हे काय बोलले?

Virat Kohli - Anushka Sharma - Sunil Gavaskar

सुनील गावसकर (Sunil Gavaskar), ज्यांचे नाव क्रिकेट जगतात अतिशय आदराने घेतले जाते आणि ज्यांचे वागणे-बोलणे नेहमीच (अपवाद वगळता) सभ्यतेच्या मर्यादेतच राहिले आहे. ते गुरुवारी कमेंट्री (Commentry) करताना असे काही बोलून गेले की ‘राम राम राम राम…’ म्हणायची वेळ आली. रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) व त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्याबद्दल सुनील गावसकर यांची ही कमेंट होती. भलेही कदाचित गावसकरांचा म्हणायचा तो हेतू नसेल; पण गावसकरांच्या या असभ्य व द्वयर्थी भासणाऱ्या या कमेंटवरून टीकेचे रान उठले असून क्रिकेटप्रेमींनी त्यांना कमेंट्रीवरून हटविण्याची मागणी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स व किंग्ज इलेव्हन दरम्यानच्या या सामन्यात विराट कोहलीच्या हातून के. एल. राहुलचे दोन झेल सुटले. त्यामुळे ८३ व ८९ धावांवर राहुलला जीवदान मिळाले आणि त्याचा लाभ उचलत राहुल ६९ चेंडूंत नाबाद १३२ धावांपर्यंत पोहचला. जीवदानानंतर राहुलने फक्त ९ चेंडूंतच ४२ धावा तडकावून काढल्या. त्यानंतर कोहली फलंदाजीतही अपयशी ठरला आणि फक्त एक धाव काढून बाद झाला तर आरसीबीचा डाव १०९ धावांतच आटोपून त्यांना ९७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

विराट फलंदाजीतही अपयशी ठरल्यावर गावसकरांनी कमेंट केली आणि जे शब्द त्यांनी त्यात वापरले ते त्यांच्याकडून अजिबातच अपेक्षित नव्हते. त्यांनी केवळ विराटच नाही तर त्याची पत्नी अनुष्कालाही विनाकारण खेचले.

गावसकर म्हणाले, इन्होने लॉकडाऊन में बस अनुष्का की गेंदों की प्रॅक्टिस की है!

लॉकडाऊनच्या काळात विराट हा अनुष्कासोबत घरीच क्रिकेट खेळत असतानाचे व्हिडीओ आले होते. गावसकर यांची कमेंट भलेही त्यासंदर्भात असेल; पण क्रिकेटप्रेमींना मात्र ती अजिबात आवडलेली नाही आणि काहींना तर ती द्वयर्थीसुद्धा वाटली आहे. काहींनी गावसकरांनी व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करणे अगदीच अनुचित आहे असे म्हटले आहे.

यानंतर सोशल मीडियावर गावसकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांना कंमेंटेटर म्हणून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER