गावसकर आणि बोर्डर म्हणतात, पहिल्या कसोटीत शुभमन गिल व रिषभ पंतला खेळवावे

Shubman Gill - Rishabh Pant - Allan Border - Sunil Gavaskar

भारत आणि आॕस्ट्रेलीयादरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अॕडिलेड (Adelaide) येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ कसा असावा, याची चर्चा आहे. ज्या दिग्गज खेळाडूंच्या नावे असलेल्या ट्रॉफीसाठी ही मालिका खेळली जाते त्या ऍलन बोर्डर (Allan Border) व सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीसुध्दा याबाबत आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते या सामन्यात भारताने शुभमान गील (Shubman Gill) याला सलामीला खेळवायला हवे तर रिषभ पंत (Rishabh Pant). हा संघात यष्टीरक्षक असायला हवा. पृथ्वी शाॕ हा अलीकडे जरा फटके मारायची घाई करत आसल्याने त्याच्याबद्दल मात्र या दोघांनीही अनुकूल मत व्यक्त केलेले नाही.

सलामी जोडी शुभमान गील व मयांक अगरवाल अशी असावी असे मत या दोन्ही दिग्गजांनी मांडले आहे. गावसकरांच्या मते शुभमान चांगला फाॕर्ममध्ये आहे तर सराव सामन्यातील शुभमानचा खेळ बघून अॕलन बोर्डर चांगलेच प्रभावीत झाले आहेत. त्याला संधी मिळाली तर तो कसोटी पदार्पण साजरे करेल आणि पृथ्वी शाॕची तो जागा घेईल.

दोन सराव सामन्यात गिलने 0, 29, 43 व 65 धावांच्या खेळी केल्या आहेत तर शाॕच्या खेळी 0, 19, 40 व 3 अशा राहिल्या आहेत. आयपीएलमध्ये पृथ्वीची कामगिरी फारशी चांगली नव्हती.

बोर्डर म्हणाले की मी गेले काही दिवस सिडनीमध्ये होतो आणि गिलच्या खेळाने मला प्रभावीत केले. त्यांचे तंत्र फारच चांगले आहे. अजुन तो,तरुण आहे म्हणून जोशात काही खराब फटके खेळणे स्वाभाविक आहे पण तो चांगला खेळाडू सिध्द होईल असे दिसते. मी जे खेळाडू पाहिले त्यात माझी त्याला पसंती असेल. शाॕ अलीकडे फारच फटके मारण्याचा प्रयत्न करतोय.पाटा खेळपट्ट्यांवर नव्या चेंडूला खेळताना ते ठीक आहे पण आॕस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर तुम्हाला विचारपूर्वक फटके खेळायला हवेत. पृथ्वी शॉने आॕक्टोबर 2018 मध्ये पदार्पण केल्यापासून चार कसोटीत 55.83 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र त्याला बचावात सुधारणा करण्याची गरज,असल्याचे गावसकर यांनी सुचविले आहे.

गावसकर म्हणाले की मी अॕलन बोर्डर यांच्याशी सहमत आहे. त्याला खेळपट्टीवर काही काळ घालवायला हवा. कारण सलामीला खेळताना खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज येण्यास वेळ लागतो. गोलंदाज काय करताहेत याचा अंदाज घ्यावा लागतो. ज्या पध्दतीने तो खेळतोय ती त्याच्या कामाची नाही. तो फटके खेळायची घाई करतोय या एबी यांच्या मताशी मी सहमत आहे.

मयांक अगरवालचे सलामीला स्थान पक्के दिसते. गेल्या आॕस्ट्रेलिया दौऱ्यात आणि आयपीएलमधील चांगल्या कामगीरीने त्याचे स्थान मजबूत आहे. गावसकर म्हणतात की मयांकची फलंदाजी बघण्यासारखी असेल. त्याने आधीच्या सामन्यांमध्ये त्याचा दर्जा दाखवला आहे. तोवर आपली सुरुवात चांगली होत नव्हती पण मयांकने पुढे येऊन खेळताना नेथन लायनला कसे खेळून काढायचे ते दाखवले होते. त्यानंतर त्याचा खेळ सुधारतच गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द त्याने द्विशतक केले आहे. त्याने लागोपाठ मोठ्या खेळी केल्या होत्या त्यामुळे या मालिकेत तो कशी कामगिरी करेल याची उत्सुकता आहे.

यष्टीरक्षकाबाबत गावसकर यांनी वृध्दिमान साहापेक्षा रिषभ पंतला पसंती दिली आहे. परदेशातील कसोटींमध्ये टीम इंडियाने नेहमीच पंतला पसंती दिली आहे. याशिवाय त्याने आॕस्ट्रेलिया ‘अ’ विरुध्द तडाखेबंद शतक केले आहे. गेल्यावेळीसुध्दा तो चारही कसोटी सामन्यात खेळला होता आणि त्याने शतकी खेळीसुध्दा केली होती. आणि यष्टीमागे काही आॕस्ट्रेलियन खेळाडूंचा संयम ढाळण्यातही तो यशस्वी ठरला होता. त्यामुळे भारतीय संघ त्याला खेळवेल अशी गावसकर यांना आशा आहे.

चेंडू वळत असणाऱ्या खेळपट्टीवर जिथे यष्टीरक्षकाला यष्ट्यांच्या जवळ उभे रहावे लागते तिथे वृध्दिमान साहा योग्य आहे पण आता आपला जलद गोलंदाजांवर अधिक भर आहे शिवायआपली फलंदाजी फळीसुध्दा मजबूत करायला हवी. त्यासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला रिषभ पंत अधिक योग्य आहे असे गावसकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER