गौतमीला घालावा लागला ढगळा ड्रेस

ड्रेस कोणताही असो, त्याच फिटिंग हे परफेक्टच असलं पाहिजे. पण आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की जो ड्रेस घालावा लागतो तो इतका ढगळा असतो की त्यामुळे सगळा मूड ऑफ होतो. बर, असा ड्रेस घालून घरीच बसायच असेल तर एकवेळ ठिक आहे, पण आपल्या मापापेक्षा चढ असलेला ड्रेस घालून बाहेर जायची वेळ आली तर काही विचारूच नका. अभिनेत्री गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) असाच ढगळा ड्रेस घालावा लागला होता. अर्थात हा असा ड्रेस घालून ती कोणत्या कार्यक्रमाला किंवा सेटवर गेली नाही तर शाळेत तिला ढगळा युनिफॉर्म घालून एक दिवस काढावा लागला होता.

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे या बहिणींचे किस्से आता त्यांच्या चाहत्यांना ओळखीचे झाले आहेत. या दोघी सतत त्यांच्या लहानपणीच्या धमाल आठवणी शेअर करत असतात. अजूनही सेलिब्रिटीपणाची झूल बाजूला ठेवून त्यांचा घरात धिंगाणा सुरू असतो. मृण्मयीच्या पावलावर पाउल टाकत गौतमीनेही छोटय़ा पडदय़ावर स्थान पटकावलं आहे. मृण्मयीताई म्हणजे अभिनयातील माझी गुरू आहे असं गौतमी नेहमीच म्हणते. या दोघींचे किस्से ऐकण म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीट असते.

गौतमीने असाच एक किस्सा शेअर केला आहे. आता पाठच्या बहिणीपाठच्या बहिणी म्हटलं की अनेकदा मोठ्या बहिणीचे ड्रेस लहान बहिणीच्या वाटणीला येत असतात आपण अनेकदा आपल्या आजूबाजूच्या घरात किंवा अगदी सर्वसामान्य लोकांच्या घरात पाहतो की मोठ्या बहिणीच्या मापातून गेलेला ड्रेस लहान बहिणीला चांगला येत असतो. लहान बहिण मोठ्या हौसेने ताईचा ड्रेस म्हणून घालून मिरवत असते. यातही एक वेगळा आनंद असतो. माझ्या आणि मृण्मयी ताईच्या बाबतीत आई नेहमी असेच करायची. तिचे अनेक ड्रेस तिला लहान होत असले की मी वापरले आहेत. म्हणजे कधीकधी असं असायचं की मी ताईच्या आवडलेल्या ड्रेसवर डोळा ठेवून बसायचे की कधी एकदा हा ड्रेस ताईला लहान होईल आणि मग तो आई मला देईल. इतकेच नव्हे तर आमच्या दोघींच्या शाळेचे युनिफॉर्म एकसारखेच होते त्यामुळे शाळेचा युनिफॉर्मदेखील ताईला लहान झाला की तो पुढच्या वर्षी आई मला वापरण्यासाठी द्यायची. एकदा पावसाळ्याचे दिवस होते आणि माझा युनिफॉर्म वाळला नव्हता. त्यामुळे मला ताईचा युनिफॉर्म घालावा लागला. अर्थातच तो तिच्या मापाचा असल्यामुळे मला इतका ढगळा झाला की दिवसभर शाळेमध्ये तो पिन्याको सतत खांद्यावरुन ओघळत होता आणि तो सांभाळत असताना माझ्या नाकी नऊ आले. आता दोघीही मोठे झाल्यानंतर किंवा आता सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना आमच्याकडे खूप ड्रेस आहेत किंबहुना काही कार्यक्रमांच्या निमित्ताने , प्रोग्रामच्या निमित्ताने नवीन ड्रेस घेणं होत असतं पण लहानपणी एकमेकींचे ड्रेस वापरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताईचा युनिफॉर्म घालून शाळेत जावं लागणं यातली मजा आज कितीही फॅशनेबल ड्रेस असले तरी त्यामध्ये येत नाही.

सध्या गौतमी माझा होशील ना या मालिकेत सई या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली आहे. तर मृण्मयी आजपर्यंत विविध मालिका सिनेमा निवेदन या क्षेत्रात मुशाफिरी करत आहे. या दोघीना साड्यांची ही प्रचंड क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघींनी कॉटन साड्यामधील फोटो शेअर केले होते. त्यालादेखील दोघींच्याही चाहत्यांनी खूप कमेंट केल्या होत्या. आज फॅशन आणि स्टाईल मध्ये गौतमीचे खूप फोटो पाहायला मिळतात पण तो ताईचा शाळेत घातलेला ड्रेस हा फोटो आजही तिच्या मोबाईलमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER