गौतम नवलाखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

गौतम नवलाखा

पुणे (प्रतिनिधी) :  एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी (ता.१२) न्यायालयाने फेटाळला. अंतरिम सुरक्षा न मिळाल्यास आता नवलाखा यांना अटक होऊ शकते. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण ११ नोव्हेंबर रोजी संपले आहे. मात्र अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले होते. त्यामुळे आता जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र नवलाखा हे पुन्हा अंतरिम संरक्षण मिळण्यासाठी अर्ज करू शकतात.

ही बातमी पण वाचा : गौतम नवलाखा हे देशद्रोहीच सरकारी पक्षाचा युक्तिवाद