‘गौसत्व कवच’ : गाईच्या शेणापासून बनवली ‘रेडिएशन रोधक चिप’ – कामधेनू आयोग

Radiation Chip

नवी दिल्ली : कामधेनू आयोगाने गाईच्या शेणापासून ‘रेडिएशन रोधक चिप’ (‘Radiation resistant chip’) तयार केली आहे. ही चिप – आजार रोखण्यासाठीही ढालीसारखे काम करेल, असा दावा आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठिरिया (Vallabhbhai Kathiria) यांनी केला.

ते म्हणालेत, गौमूत्र आणि शेणाचे फायदे आपल्याला माहित आहेतच. गाईच्या शेणापासून ‘अँटी रेडिएशन चिप’ बनवली आहे. गाईचे शेण रेडिएशन आहे हे चाचणीत सिद्ध झाले आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते. आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे.

ही चिप मोबाईलमध्ये ठेवली तर रेडिएशन कमी होते. आजारांपासून दूर राहायचे असेल, तर याचा वापर करू शकता,” असं ते म्हणाले. या अँटी रेडिएशन चिपचे नाव ‘गौसत्व कवच’ ठेवण्यात आले आहे. ही चिप राजकोटमधील श्रीजी गौशाळेने तयार केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER