25 डिसेंबरला गौहर खानचा होणार निकाह

Gauhar Khan - Zaid Darbar

‘बिग बॉस’मुळे देशभरात फेमस झालेली अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) 25 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. स्वतः गौहरनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच गौहर खानने तिचा बॉयफ्रेंड झैद दरबारबरोबर (Zaid Darbar) साखरपुडा केला होता. त्याचदिवशी गौहर 25 डिसेंबरला लग्न करणार असे म्हटले जात होते. परंतु गौहरने याबाबत काहीही सांगितले नव्हते त्यामुळे लग्न कदाचित पुढील वर्षी होईल असे म्हटले जात होते. परंतु आता स्वतः गौहरनेच लग्नाची तारीख सांगितली आहे.

गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर झैदसोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये झैद कुर्ता पायजमा आणि गौहर लाँग स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोंसोबत गौहरने एक कार्डही शेअर केले आहे. त्या कार्डवर लिहिले आहे की, यावर्षी गौहर आणि झैद लग्न करीत आहेत. मात्र कार्डवर तारीख नाही. गौहरने फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये #25thDec2020 असे लिहिले आहे. त्यावरून हे दोघे 25 डिसेंबर रोजीच लग्न करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

गौहर आणि झैेद प्रीवेडिंग शूटसाठी पुण्यातील जाधवगढ येथे जाणार असून लग्नासाठी आईटीसी मराठा हॉटेलची निवड केल्याचे सांगितले जात आहे. गौहरला तिचे लग्न राजेशाही पद्धतीने करायचे असल्याने तिच्या लग्नाची थीम रॉयल ठेवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER