डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला

Donald Trump India Tour

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला आहे. जोरदार हवेमुळे हा गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे.

मोटेरा स्टेडियमच्या गेट नंबर तीनवर हा तात्पुरता गेट उभारण्यात आला होता. याच गेटमधून डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी प्रवेश करणार होते. मात्र, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना मोटेरा स्टेडियममधील गेट कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालीली नाही.

नितेश राणे यांनी केली मराठा आंदोलकांची झोपण्याची व्यवस्था

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. जगात सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम समजले जाणारे मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यांची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. कारणही तसेच आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प, जावई जेरेड कुशनर भारत दौऱ्यावर येत आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017 मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती.