पेट्रोल शंभर पार ! मोदी सरकार मॅन ऑफ द मॅच; राष्ट्रवादी काँग्रेसने लावले फलक

Modi Poster - Maharashtra Today

ठाणे : मे महिन्यात इंधनाचे दर सुमारे १४ वेळा वाढले आहेत. पेट्रोलने आता शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिल्याचे फलक लावले आहेत.

देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील ४ तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाली. ठाणे- मुंबईत पेट्रोल शंभरच्या पार गेले आहे. डीझेलची किंमत २९ पैसे वाढली. ठाणे- मुंबईत पेट्रोल आज १००. ४ रुपये आणि डिझेल ९१. ८७ रुपये लिटर आहे.

ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे म्हटले आहे. ” मॅन ऑफ द मॅच; पेट्रोल १०० नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा संदेश फलकांवर लिहिला आहे. या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे म्हणालेत की, इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात फलक लावले आहेत. नरेंद्र मोदी आणि भाजपाचे नेते ” बहुत हुई महँगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असे ओरडत होते. आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे. यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढ महाग झाले नव्हते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

सौजन्य:-Lokmat

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button