चाय ले लो..चाय ..गरमागरम ‘तंदुरी चाय’…

tandorri tea

मंडळी.. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मस्त, गरमागरम ‘तंदुरी चहा’. काय गोंधळलात कि काय?? हो..बरोबर एकलात तुम्ही..तंदुरी कबाब, किंवा तंदुरी चिकन नाही तर आज आपण बनविणार आहोत तंदुरी चहा. हे चहा पुणेमध्ये खूप लोकप्रिय आहे. बीएससी झालेल्या अमोल राजदेव आणि एम फार्म झालेल्या प्रमोद बाणकर या युवकांनी हा चहाचा प्रकार शोधून काढला आहे. ते दोघे थंडीच्या दिवसात गावाकडे गेले असताना एका आजीने त्यांना मातीच्या मडक्यात दूध प्यायला दिले होते. यातूनच त्यांना तंदुरी चहाची कल्पना सुचलीतंदुरी चाय. त्यानंतर त्यांनी स्वताचे एक दुकान सुरु केले. त्याच नाव आहे ‘चाय ला’…हा चहा पिण्यासाठी लोकांची मोठी गर्दी ‘चाय ला’ टपरीवर असते. एकदा काय तुम्ही हा चहा प्यायलात तर तुम्ही याचा स्वाद कधीच विसरू शकणार नाही एवढे मात्र नक्की. पण या साठी तुम्हाला पुणे ला जायची गरज पडणार नाही. तुम्ही हे चहा तुमच्या घरी देखील बनवू शकता. या साठी तुम्हाला हवे आहे ३-४  कोळश्याचे टुकडे. हे टुकडे काही वेळा पर्यंत शेगडीवर गरम करून घ्यावे. तो पर्यंत एकीकडे चहा बनवून घ्यावे. कोळशे गरम झाले की त्यावर मातीचे कप गरम करायला ठेवावे. नंतर एक पॅन किंवा भांड घ्यावा. त्याला देखील थोडा गरम करून घ्यावा. आता त्या गरम भांड्यामध्ये गरम केलेले मातीचे कप ठेवावे आणि आधीच गाळलेले चहा ओतावे. नंतर परत एकदा रोजच्या कपा मध्ये ते चहा ओतावे. गरमागरम तंदुरी चहा रेडी….

ही बातमी पण वाचा : सुट्टीच्या दिवशी बनवा सिंधी ‘दाल पकवान’..