इंडो चायनीज चा तडका ”गार्लिक चिकन”

garlic chicken

जर तुम्हाला इंडो चायनीज पदार्थ खायला आवडत असेल तर आजची रेसिपी म्हणजेच ”गार्लिक चिकन” खास तुमच्यासाठीच आहे. या दिश मध्ये भारतीय मसाल्यांचा उपयोग केला जातो. ज्यामुळे ही डिश आणखी स्वादिष्ट वाटते. शिवाय हा पदार्थ बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही. त्यामुळे कमी वेळात तुम्ही या डिश चा आस्वाद घेऊ शकता. तर चला बघूया ही रेसिपी..

साहित्य :-   Chicken

  • १ किलो चिकन,
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • ३ ते ४ लसूणचे कांदे,
  • ४०० ग्रॅम दही,
  • चिकन मसाला,
  • गरम मसाला,
  • हळद,
  • कसूरी मेथी,
  • काश्मिरी मिर्च पावडऱ
  • चवीनुसार मीठ.

कृती :- प्रथम चिकनला मीठ चोळून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही एक चमचा तेल़, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मेरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कसूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. चिकनच्या तुकडयांना स्पर्श न करता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा. तुमची गार्लिक चिकन तयार..

ही बातमी पण वाचा : खास खेळाडूंसाठी ‘लो फॅट चिकन करी’..