गार्डन्स क्लबचा सुवर्ण महोत्सव : ‘किंग ऑफ द शो’ आणि ‘क्वीन ऑफ द शो’ हे संजय घोडावत ग्रुपकडे

Rose

कोल्हापूर : निसर्गाच्या सानिध्यात माणूस आपल्या सर्व चिंता यापासून मुक्त होतो. म्हणूनच झाडे आपल्याला तणावमुक्त करतात, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांनी केले. गार्डन्स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय पुष्परचना स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

गार्डन्स क्लबची स्थापना १९६९ झाली. पहिले पुष्प प्रदर्शन १९७० साली घेण्यात आले. होते. त्या पहिल्या पुष्पप्रदर्शन यापासून ते या पन्नासाव्या पुष्पप्रदर्शनापर्यंत साक्षीदार असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गार्डन्स क्लबच्यावतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये आल्या आहेत या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच स्पर्धा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.

यामध्ये गुलाब, एकच जातीचे गुलाब, बटण गुलाब ,बटण गुच्छ,कोणतेही गुलाब,गुलाब तीन टप्प्यातील, विविध फुले, पुष्परचना, कुंड्यातील रोपे, बोन्साय, ट्रेलँडस्कोप व टेरारीयम, बुके स्पर्धा, गार्डन ऑफ द इयर,सॅलेड डेकोरेशन हँगिंग बास्केट आणि मुक्तरचना या विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘क्वीन ऑफ द शो’ आणि ‘किंग ऑफ द शो’ हे संजय घोडावत ग्रुपने पटकावले.डॉ.मैथिली नाईक यांची ‘वृक्षायुर्वेद’ प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथमधील वनस्पती संगोपन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी गार्डन्स क्लबचे सर्व संचालक व सदस्य, वृक्षप्रेमी,उद्यानप्रेमी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER