महाराष्ट्रातील गणपती, विसर्जनासाठी मार्गस्थ

Lord Ganesh

मुंबई :- आज अनंत चतुर्दशी. दहा दिवस गणपती बाप्पांची मनोभावे पुजापाठ, सेवा केल्यानंतर आज त्यांना निरोप देण्य़ाचा दिवस उजाळला. मागील 11 दिवस गणपती बाप्पांनी गणेशभक्तांच्या आयुष्यात नवचैतन्य आणलं होतं. अखेर त्याला निरोप देण्याचा दिवस आल्याने अनेकजण भावूकही होत आहेत.

ही बातमी पण वाचा : मानाच्या तुकाराम माळी तालिमीच्या गणेशाने मिरवणुकीला सुरुवात

अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. राज्यभरात समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ गणपती बाप्पांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठीही मोठी गर्दी उसळणार आहे.

मुंबईचा राजादेखील सकाळी 8-30वाजताच्या सुमारास विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुंबईत गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी पन्नास हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथेही गणेश विसर्जनासाठी गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. नागपूरातील मानाचा गणपती नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे.

ही बातमी पण वाचा : अनंत चतुर्थीसाठी मुंबई पोलिसाँचा ५० हज़ाराचा फ़ौजफ़ाटा सज्ज