गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरमध्ये ठार

Gangster Vikas Dubey killed in encounter

कानपूर : पोलिसांची हत्या करणारा गॅंगस्टर विकास दूबे एन्काउंटरमध्ये ठार झाला आहे. पोलिसांची हत्या करून विकास दूबे पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बक्षीसदेखील ठेवले होते. अखेर काल महाकाल मंदीरात विकास दूबे ने स्वतःच मी विकास दूबे असे सांगत तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर आज सकाळी विकास दूबे एन्काउंटरमध्ये ठार झाला आहे. या एन्काउंटरने अनेक प्रश्न मागे सोडले आहे.

ही बातमी पण वाचा:- एक शरद… सगळे गारद! ; संजय राऊतांनी  केला मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध

कसा झाला एन्काउंटर :

कुख्यात गँगस्टर विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा कानपूरला जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली. या अपघातादरम्यान विकास ज्या गाडीत बसला होती ती कार उलटी झाली. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउंटर केला आहे.

अपघाताचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. कार उलटल्यानंतर विकास दुबे फरार झाला मात्र बाजूला असलेल्या शेतात पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. यावेळी विकासने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही बचावात्मक गोळीबार सुरू केला. विकासला सरेंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र त्यानं गोळीबार सुरू ठेवल्याा. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला आहे.

कानपूर पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा कानपूरला जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली. या अपघातादरम्यान विकास ज्या गाडीत बसला होती ती कार उलटी झाली. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउंटर केला आहे.

अपघाताचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. कार उलटल्यानंतर विकास दुबे फरार झाला मात्र बाजूला असलेल्या शेतात पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. यावेळी विकासने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही बचावात्मक गोळीबार सुरू केला. विकासला सरेंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र त्यानं गोळीबार सुरू ठेवल्याा. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER