गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिक : नाशिक मधील सिडको येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका कॉलेज विद्यार्थ्यासह पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या पीडित मुलीसह हे सर्व अल्पवयीन आरोपी मुलं नाशिकमधील एका नामांकित इंग्लिश मीडियम शाळेतच शिकतात. सप्टेंबर २०१६ हे प्रकरण घडलं असून या आरोपी मुलांपैकी एकाने
पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि या नंतर तिच्या वर सर्वच आरोपी अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. सोबतच या प्रकरणाची वाच्यता कुठे केली तर जिवाने मारण्याची धमकीही दिली होती.

मात्र पीडित मुलीने रविवारी याबाबत घरी सांगितल्यानंतर हा प्रकार मात्र उघडकीस आलाय. यानंतर रात्री उशिरा अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी मुलांना ताब्यात घेतलंय .