सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही – अजित पवार

पुणे :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ (Corona Virus) बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंदाच्या वर्षी वारी, दहीहंडी हे उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिवेशनसुद्धा रद्द केले. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा.

तसेच गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे (Pune) शहरासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आपण प्रत्येक उत्सव साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करत आहोत. तसेच गणेश उत्सवदेखील करण्यात यावा.

त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्युदर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER