टेकडीचा गणपती, नागपूर

ganesh tekdimandir-nagpur 1

हे गणपती मंदिर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर टेकडीवर आहे म्हणून याला टेकडी गणपती म्हणतात. हा भाग आता लष्कराच्या ताब्यात आहे. देवस्थान अतिशय पुरातन आहे. इंग्रजांच्या राजवटीत शुक्रवारी तलावाचा विस्तार येथपर्यंत होता. असे सांगतात की भोसले राजे नावेतून या गणपतीच्या दर्शनाला येत होते. रेल्वे स्टेशन निर्माण झाल्यानंतर या गणपतीला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. आता तर मंदिरात रोज गर्दी असते.

Tekdi Ganesh-nagpur

१२ व्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते असे सांगतात. यादवांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. नंतर मुसलमानांच्या राजवटीत मंदिराचा विध्वंस करण्यात आला होता. १९२४ ला इथे पत्र्याचे मंदिर बांधण्यात आले. आता चांगले मंदिर बांधले आहे. मूळ मूर्ती उजव्या सोंडेची, ३ फूट उंच आहे. शेंदूर लेपनाने आता मूर्तीचे हात, पाय, डोके अस्पष्ट झाले आहे.

ही बातमी पण वाचा : श्री गणपती मंदिर, राजूर

– देवदास चव्हाण
मोबाईल : ९३२२३ ४४६९३