पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन

श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना

Pankaja Munde

मुंबई :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले. मंत्री पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली.

राज्यावरील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी राज्य शासनाला बळ मिळो, पिकपाण्याने बळीराजा सुखी समाधानी होवो तसेच जातीपातीच्या भिंती झुगारून राज्यातील जनतेला भरभरून विकास मिळावा, यासाठी आम्हाला शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

ही बातमी पण वाचा : श्रींच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज