मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती दे - मुख्यमंत्र्यांची श्रीगणेशाचरणी प्रार्थना

Hon CM - Lord Ganesh Darshan At Vasha

मुंबई :- जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी श्रीगणेशाचरणी केली.

जगभरातील गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले, गणेशउत्सव हा सर्वांसाठी आनंदाचा पर्व आहे. सर्वांना गणरायाचा आशिर्वाद मिळावा. विशेषत: राज्यातील पूरपीडित बांधवांना त्यांच्या जीवनात समाधान मिळावे, अशीही प्रार्थना त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन