आमचे जितके नगरसेवक फोडाल त्याच्या दुप्पट तुमचे फोडू; गणेश नाईकांचा शिवसेनेनाला इशारा

Ganesh Naik-CM Thackeray

नवी मुंबई :- आमचे जितके नगरसेवक फोडाल त्याच्या दुप्पट आम्ही तुमचे फोडू, असा इशारा भाजपाचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी शिवसेनेला (Shivsena) दिला. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये भाजपाला गळती लागली आहे. अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत. यावरून नाईक यांनी उल्लेखित इशारा दिला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षांना उद्देशून ते म्हणालेत – ‘तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार फोडू, आमचे चार फोडले तर तुमचे आठ फोडू. मी एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहात नाही.’

भाजपाचे १४ नगरसेवक गेले

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे येथील राजकीय वारे तापले आहे. नगरसेवक फोडाफोडी जोरात सुरू आहे. गेल्या वर्षी सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगसेवकांनी नाईक यांची साथ सोडली. त्यानंतर आतापर्यंत १४ नगरसेवक   भाजपाला सोडून गेले आहेत.

नाईक म्हणालेत, १९९७ पासून अनेक नगसेवक सोडून जात आहेत. तरीदेखील नवी मुंबईकरांनी सत्तेचे दान आमच्याच पारड्यात टाकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो अथवा कोणतीही मोठी आघाडी असो महापौर आमचाच होणार. भाजपा सोडून जाणाऱ्यांचे देव भले करो, असा टोमणा त्यांनी मारला.

शिवसेनेच्या गुंडगिरीला भिऊ नका

शिवसेना धमक्या देऊन नगरसेवक फोडते. त्यांच्या गुंडगिरीला अजिबात घाबरू नका. वेळ येईल त्यावेळी मला फोन करा; अर्ध्या रात्रीला हजर होईल, नाईकांनी असा धीर कार्यकर्त्यांना दिला.

ही बातमी पण वाचा : आणखी सात नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER