गणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’: शिवसेनेची टीका

Ganesh Naik - Vijay Nahata

मुंबई : भाजप (BJP) नेते गणेश नाईक हे भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना गद्दार म्हणतात. सायकलवरून फिरणाऱ्या गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाकरे आणि पवारांनी मोठे केले. मात्र, नाईकांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात, अशी जळजळीत टीका शिवसेना (Shiv Sena) नेते विजय नाहटा (Vijay Nahata) यांनी केली.

ते रविवारी नवी मुंबईतील महाविकासआघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात बोलत होते. यावेळी विजय नाहटा यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. स्वत:ला नवी मुंबईचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्यांचा शहराच्या विकासात कुठलाही सहभाग नाही. शिल्पकार घराण्याच्या बाहेर कोणालाही पद देत नाहीत. फक्त कंत्राटातून आपल्या कमिशनचे पाच टक्के घेतात. त्यामुळे गणेश नाईक यांना शिल्पकार नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’ म्हटले पाहिजे, असे टीकास्त्र विजय नाहटा यांनी सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER