साताऱ्यात गणेश उत्सव नियमावली जाहीर

गणेशोत्सव - सातारा

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवात (Ganeshotsav ) देखावे, विसर्जन मिरवणुकांना बंदी आहे. वर्गणी, देणग्या गोळा करण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.पोलिस आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. गणेश मंडळांना चार फुटांपर्यंत उंचीच्या श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बाप्पांच्या आगमनाला काही दिवसांचाच कालावधी उरला आहे. जिल्हावासीयांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. ठिकठिकाणी गणेशोत्सवाची लगबग सुरु असून सार्वजनिक गणेश मंडळांची तयारीही झाली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रकोप वाढत आहे. . जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गणेशोत्सव बाबत आदेश दिले आहेत. न्यायालयाने तसेच स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबत घेतलेल्या धोरणाचा विचार करुन मंडळांना मंडपाचे स्वरुप मर्यादित ठेवावे लागणार आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवात कोणतीही भपकेबाजी न करता साधेपणा असावा. मनोरंजनाचे कार्यक्रम, देखावे तसेच प्रदर्शनांना सक्त मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांसाठी गणेशमूर्ती 4 फुटांची तर घरगुती गणपती मूर्ती 2 फुटांची असली पाहिजे. गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्ती पूजन करावे. गणेश मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरी करावे, असे नियमावलीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER