गनेमत सेखोंने जिंकून दिले स्कीट नेमबाजीत पहिले पदक

Ganemat Sekhon - Maharastra Today

भारतीय महिला खेळांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची दालने उघडत आहेत. 20 वर्षीय नेमबाज गनेमत सेखों (Ganemat Sekhon) हिने भारतीय महिलांसाठी यशाचे नवे पान लिहिले आहे. ती नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेतील स्कीट या स्पर्धाप्रकारात भारताला पदक जिंकून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नवी दिल्ली येथील स्पर्धेत तिने हे ऐतिहासिक यश मिळवलै आहे.

गनेमत ही पात्रता स्पर्धेअखेर 117 गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. सुवर्णपदक विजेती ठरलेली ब्रिटनची अंबर हिल ही तिच्यापुढे होती. त्यानंतर अंतिम फेरीत सुरुवातीच्या बेचैनीवर मात करत नंतर विश्वासाने गनेमतने कास्यपदक जिंकले. ती म्हणते की अंतिम फेरी गाठू याचा मला अंदाज होताच पण पदक जिंकून आणल्याने मी रोमांचीत व आनंदीत आहे.

स्कीट हा नेमबाजीतील विशिष्ट स्पर्धाप्रकार आहेत ज्यात स्पर्धक शाॕटगन वापरतात. रेंजच्या दोन्ही बाजूने वेगवेगळ्या कोनात आणि कमी अधिक वेगाने यंत्राद्वारे मातीचे गोळे फेकले जातात. ते लक्ष्य नेमबाजांना साधायचे असते. त्यात गनेमतने भारतीय महिलांना हे पहिले यश मिळवून दिले आहे.

तिच्या या यशात इटालियन कलाकुसर व चंदीगडच्या सुतारकामाचे योगदान आहे. कोरोनाच्या साथीत तिच्या बंदुकीचा महत्त्वाचा कारागीर वारला, त्यानंतर तिने भारतीय कारागिरांची मदत घेतली. अशा या सुधारीत गनसह तिने आता हे ऐतिहासिक यश मिळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER