
गण्डूष ही नित्य दिनचर्येचा विधी आहे. गण्डूष म्हणजे गाल पूर्ण फुगतील एवढे द्रव पाणी अथवा काढा तोंडात घेतला जातो की द्रव फिरवायला जागा राहणार नाही. हा काढा किंवा द्रव, लाळ तयार होत नाही गाल दुखत नाही व डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत धारण केला जातो व नंतर बाहेर थूकल्या जातो. मुखशुद्धी मुख विकारांवर ही उत्तम चिकित्सा आहे.
दैनंदिन उपयोगात तिळाचा कल्क, तिळतेल अथवा दूधाचा वापर करून गण्डूष केल्यास मुखशुद्ध राहते. दात मजबूत राहतात. दंतविकार, मुखपाक होत नाही तसेच तोंडाचा वास येत नाही. जिव्हा स्वच्छ राहते व अन्नाचे पाचन व चव व्यवस्थित कळते. ओठ रुक्ष होत नाहीत. आवाज चांगला होतो.
काही विकारांमधे गण्डूष द्रव्य बदल्यास लगेच आराम मिळतो. घरच्या घरी करता येण्यासारखे काही उपाय बघूया –
- तोंड चिकट वाटणे जीभेला फोड येणे – मध वापरून गण्डूष केल्यास तोंडाचा जीभेचा चिकटपणा कमी होतो व व्रण भरून येतात.
- चुना, अति गरम वस्तूचा स्पर्श झाल्यास – कधी कधी गरम चहा किंवा एखादा गरम पदार्थ खाल्यास जीभ पोळली जाते.
- चुना पानात जास्त झाल्यास जीभ एकदम रुक्ष होते अशावेळी दूध अथवा दूध तूपाचा गण्डूष करावा.
- मुखपाक जिभेला फोड येत असल्यास – चमेली आंबा जांभळाच्या कोवळ्या पानांचा काढा करून गंडूष उपयोगी आहे.
- मुखशुष्कता – सतत तोंड कोरडे पडत असेल तर थंड कांजी वापरून गंडूष करावे.
- गुळण्या ( कवल) वा गण्डूष ५ वर्षाखालील मुलांना देऊ नये.
- स्वास्थ्यरक्षणाकरीता रोज एकदातरी तीळतेल वापरून गण्डूष करावा. तीळ कुटून हा कल्क पाण्यात मिसळून रोज गण्डूष केल्यास दात आंबणे, दात हलणे, मुखरोग होत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला