डॉक्टरेटचा अभ्यास करून चित्रपटांमध्ये आले गजेंद्र चौहान

Gajendra Chauhan

१० ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan) आपला वाढदिवस साजरा करतात. त्यांनी बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटांत काम केले, पण मुख्य अभिनेता म्हणून जास्त नाव कमवता आले नाही. गजेंद्र चौहान यांनी बर्‍याच टीव्ही मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. बीआर चोपडा (B. R. Chopra) यांच्या सुपरहिट पौराणिक मालिका महाभारतात ते अजूनही युधिष्ठिर म्हणून ओळखले जातात.

गजेंद्र चौहान यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाला होता. त्यांनी दिल्लीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. गजेंद्र चौहान यांच्या फार कमी चाहत्यांना हे माहित असेल की त्यांनी डॉक्टरेटचा अभ्यास केला आहे. त्यांच्याकडे एम्स कडून रेडिओग्राफीचा डिप्लोमा आहे. गजेंद्र चौहान यांनी टीव्ही मालिकांमधून अभिनयात पदार्पण केले. यानंतर त्यांनी चित्रपट जगतात प्रवेश केला.

गजेंद्र चौहान यांनी ‘मैं चूप नहीं बैठूंगा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट १९८५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर ते बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले. दिग्दर्शक बी.आर. चोपडा यांच्या पौराणिक टीव्ही सीरियल महाभारतातून गजेंद्र चौहान यांना चित्रपट जगतात ख्याती मिळाली. १९८८ मध्ये दूरदर्शनवर मालिका प्रसारित होत होती.

महाभारतात गजेंद्र चौहान यांनी युधिष्ठिरची व्यक्तिरेखा साकारली होती. फारच थोड्या लोकांना हे माहित असेल की गजेंद्र चौहान यांची निवड युधिष्ठिरसाठी नव्हे तर कृष्णाच्या भूमिकेसाठी केली गेली होती, परंतु नंतर वजन वाढल्यामुळे त्यांना युधिष्ठिरची भूमिका करावी लागली. गजेंद्र चौहानही वादात अडकले आहेत.

वर्ष २०१५ मध्ये गजेंद्र चौहान यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यावर वाद झाला होता. एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या निवडीस विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध होता. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येसुद्धा त्याच्या नेमणुकीबाबत फूट पडलेली दिसून आली. बरीच फिल्मस्टार्स गजेंद्र चौहानच्या समर्थनात होते तर अनेक जण त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER