गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या शफीन पठाणला सुवर्ण पदक

Gpis student

नागपूर : गायकवाड -पाटील इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी शफीन पठाणने आंतर शालेय जिल्हा क्रीडा महोत्सवात मैदानी स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकाविले.

प्रशिक्षक मुकुल बिलोरे यांनी त्याला प्रशिक्षण दिले तर पीटीई शिक्षक पंकज कुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य व संचालक शबीह चौरसिया तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड-पाटील यांनी विजेत्या शफीनचे अभिनंदन केले.