कोविड – १९ बाबत खोट्या बातम्या; तो आदेश अस्तित्वात नाही, सरकारची माहिती

Bombay High Court

मुंबई :- कोविड – १९ बाबत खोट्या बातम्या सोशल मीडियावर टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश आता अस्तित्वात नाही अशी माहिती महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

हा आदेश नागरिकांच्या भाषण आणि भावना व्यक्तकरणाच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा आहे. साथीचा रोग हाताळण्याबाबत सरकारच्या गलथानपणावर टीका करण्याच्या अधिकारावर गदा आणणारा आहे, अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीत सरकारने न्यायालयाला उल्लेखित माहिती दिली.

सरकारतर्फे न्यायमूर्ती अमजद सईद आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले की, मुंबई पोलिसांनी पारित केलेला याबाबतचा आदेश ८ जूनपर्यंतच लागू होता. याबाबत माहिती देताना राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की – हा आदेश मुंबई पोलिस कायदा कलम १४४ च्या गुन्हेगारी प्राक्रियेंतर्गत पोलीस उपायुक्तांनी काढला होता व तो ८ जूनपर्यंत लागू होता. सर्कसने त्याला मुदतवाद दिली नाही त्यामुळे तो आता अस्तित्वात नाही. मात्र, कोणतीही बेकायदा बाब लक्षात आली तर पोलीस त्याविरुद्ध कारवाई करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER