गडकरींच्या प्रयत्नाने वर्ध्यात होणार म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती

Maharashtra Today

वर्धा :- राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा रोज वाढतो आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) प्रयत्नाने वर्ध्यात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे (Mucormycosis injections)उत्पादन सुरू होणार आहे. आगामी १५ दिवसात हे उत्पादन सुरू होईल. रोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन होईल.

नितीन गडकरींच्या कार्यालयाने म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या निर्मितीबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आहे. ‘एम्फोटेरीसीन बी’चे एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळते. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्सची गरज असते. सध्या ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारे इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल.

महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएने परवानगी दिली आहे. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘गडकरींनी करुन दाखवलं’; विदर्भातील उत्पादित रेमडेसिवीरचा पहिला साठा हस्तांतरित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button