सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत विद्युत ऊर्जेचा इंधनाला चांगला पर्याय आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मांडले. प्रत्येक विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन दिले जावेत, अशी सूचना गडकरी यांनी ‘गो इलेक्ट्रिक’ कार्यक्रमात केली.

“सरकार गरिबांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देते. त्याऐवजी विजेवर चालणाऱ्या उपकरणांद्वारे स्वयंपाक बनवला जातो, अशा उपकरणांवर सबसिडी देण्यात यावी. पण, अन्न शिजवणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांवर सबसिडी का देत नाहीत?” असा सवाल गडकरींनी यावेळी केला. “गॅस सिलेंडरच्या आयातीवर किती दिवस निर्भर राहायचे? विशेषतः विजेच्या उपकरणांवर अतिशय स्वच्छता राखत स्वयंपाक करता येतो.” असेदेखील ते म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करण्यात यावी
सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करण्यात यावी, अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी वीज विभागातील अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन अनिवार्य करावे, असा आग्रह गडकरींनी केला. दिल्लीत १० हजार इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करण्यात आला, तर महिन्याला ३० कोटी रुपयांची बचत होईल. याशिवाय आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसाठीदेखील अशा प्रकारचे पाऊल उचलू, अशी घोषणा गडकरींनी केली आहे. दरम्यान, आर. के. सिंह यांनी यावेळी दिल्ली-आग्रा आणि दिल्ली-जयपूर या मार्गावर ‘फ्यूल सेल’ बस सुरू केली जाणार असल्याची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER