गडकरींनी पुन्हा एकदा जनतेची मनं जिंकली; म्हणाले, ‘माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक’

मुंबई :- कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला (Modi govt)अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी करोनाविरोधीत लढ्याचं नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवलं जावं अशी मागणी केली आहे. दरम्यान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्वामींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते वर्ध्यात बोलत होते.

“मी काही उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत, सामाजिक दायित्व निभावण्यासाठी मी केवळ पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

वर्ध्याच्या औद्योगिक परिसरात जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडिसिविर औषधाच्या उत्पादनास सुरुवात झाली आहे. गडकरी यांच्या माध्यमातून अतिशय कमी वेळात केंद्र सरकारची परवानगी मिळवणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. येथे दररोज तीस हजार कुप्यांचं उत्पादन होणार आहे. गुरुवारी गडकरी यांनी कंपनीस भेट देऊन उत्पादनाचा आढावा घेतला. गरजू गरिबांना शासकीय दराने हे औषध उपलब्ध होईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : ‘रेमडेसिव्हीर’चे वर्ध्यात उत्पादन सुरू, गडकरींनी मिळवून दिला परवाना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button