फक्त दोन महिन्यात मनसे आमदाराला दिलेला शब्द गडकरींनी पाळला’, पूर्ण केली मागणी

Nitin Gadkari-Raju Patil

ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता व्हावा अशी मागणी केली होती. त्याचसोबत सदर रस्त्याचा ‘राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा (लिंक) प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो असं आश्वासन दिलं होतं. तसेच सध्या एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गाचा अंतर्गत येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द पण गडकरींना दिला होता. तो शब्द अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) पाळला आहे. याबद्दल आमदार राजू पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

राजू पाटील यांनी नागपूरात जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. यावेळी राजू पाटील यांनी गडकरींना पत्र दिलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. तत्कालिन आमदार स्व.हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही.

त्यानंतर नितीन गडकरी यांनी १७ एप्रिलला आमदार राजू पाटील यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, माझ्या विभागानं २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. त्या अंतर्गत कल्याण ते निर्मल रोडच्या दुरुस्ती आणि निर्मितीसाठी ४८.६१ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यानंतर आमदार राजू पाटील यांनी गडकरींचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button