‘रेमडेसिवीर’चे वर्ध्यात उत्पादन सुरू; गडकरींनी मिळवून दिला परवाना !

Nitin Gadkari-Remadesivir injection

वर्धा :- कोरोनावर (Corona Virus) प्रभावी असलेल्या औषधांपैकी एक ‘रेमडेसिवीर’चा (Remadesivir) राज्यात तुटवडा आहे. दरम्यान, वर्ध्याच्या ‘जेनेटिक लाईफ सायन्स कंपनी’मध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. रोज ३० हजार इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी परवाना मिळवून दिला आहे.

आजपासून उत्पादन
जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले आहे. नितीन गडकरी यांनी नुकताच वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस त्यांच्यासोबत उपस्थित होते. जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिवीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीची सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्सला ‘उसनवार तत्त्वावर’ निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘फक्त दोन महिन्यात मनसे आमदाराला दिलेला शब्द गडकरींनी पाळला’, पूर्ण केली मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button