
मुंबई :- काल लोकसभेत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वाहनधारकांना मोठा दिलासा दिला. देशभरातील सर्व टोलनाके एका वर्षात हटवले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली आहे. नितीन गडकरी यांच्या या घोषणनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात आलं आहे. याबाबत मनसेकडून राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. नितीन गडकरींच्या घोषणेनंतर मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्वीटर पेजवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
ही बातमी पण वाचा : जेवढा प्रवास तेवढाच टोल, गडकरींची लोकसभेत घोषणा
मागील काही वर्षांपासून मनसेनं टोल वसुली बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलनं केली होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनी ही घोषणा केल्यानंतर मनसेनंही एक ट्वीट केलं आहे. आम्ही अनावश्यक, अनधिकृत टोलबाबत आंदोलनं केली, ६० हून अधिक टोलनाके बंद झाले. त्यानंतर राजसाहेबांनी २०१४ साली, विकास अराखड्यात हीच कल्पना मांडली होती, असं ट्वीट मनसेनं केलं आहे. सोबतच, राज ठाकरेंच्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओही ट्वीट केला आहे.
‘मी पहिल्यापासून भूमिका मांडली होती माझा टोलला विरोध नाही पण टोलमधून आलेल्या पैशा जातोय कुठे, त्या पैशाचं होतंय काय?, तो संपूर्ण पैसा हा रोख रक्कमेवर होतो. तुम्ही तिथे कॅश देता, नोट देता त्यामुळं तिथं किती काम झालंय, किती पैसे आले, किती गाड्या आल्या याचा कोणालाही थांगपत्ता नसतो.’ ‘त्यामुळं आम्ही एक सिस्टिमबद्दलचा विचार मांडलाय. जर टोल भरायचा असेल तर टोलनाक्यावर फक्त तुम्हाला पावती द्यायची असेल तुम्ही आगोदरच त्या टोलचे पैसे भरलेले असतील ते सरकारी खात्यात जमा होती. पण ते कोणत्याही खासगी माणसांच्या खिशात जाणार नाहीत. आणि संपूर्ण टोलवरचा सगळा कारभार कॅशने बंद होईल.’ असं या व्हिडिओत सांगण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी ह्यांनी नुकतीच घोषणा केली की, “पुढील वर्षभरात टोल यंत्रणेत GPS तंत्रप्रणालीने पारदर्शकता आणू.”
आम्ही अनावश्यक, अनधिकृत टोलबाबत आंदोलनं केली, ६० हुन अधिक टोलनाके बंद झाले. त्यानंतर राजसाहेबांनी २०१४ साली, विकास आराखड्यात हीच कल्पना मांडली होती. pic.twitter.com/LWHGWb4d8Y
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 18, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला